नमस्कार शेतकरी मित्रानों आता शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी मार्केटला जाण्याची गरज नाही किंवा कुणाला फोनही करण्याची गरज नाही.
तुम्ही घरबसल्या फोनवर राज्यभरातील आणि तुमच्या शेजारील मार्केटमध्ये शेतमालाची काय दरानं खरेदी केली जात आहे, ते पाहू शकता.
इथं तुम्ही केवळ तुमच्या भागातीलच नाही, तर तुमच्या शेतमालाला देशातल्या कोणत्या बाजारपेठेत किती दर मिळतोय, तेही पाहू शकता.
असे पाहा शेतमालाचे बाजारभाव
पिकांचे दररोजचे बाजारभाव पाहण्याचं ठिकाण म्हणजे https://mahabajarbhav.in
वेबसाईट आहे, जिथं तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठांधील पिकांचे बाजारभाव पाहता येतात.